UNLIKELY HERO OM PURI – अनलाइकली हिरो ओम पुरी

SKU: 6593
Publisher:
Our Price

220.00

Product Highlights

अनलाइकली हिरो` या पुस्तकात ओम पुरी यांचे खासगी आयुष्य, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची अस्वस्थता, त्यांच्या हृदयातील वेदना यांचे दर्शन घडते. पंजाबातून डोळ्यांत स्वप्ने घेऊन आलेला मुखदुर्बळ कलाकार, ‘एनएसडी’मधील जातिवंत ‘फ्लर्ट’, खाण्याचा शौकीन व उत्तम कूक आणि पूर्णत: कुटुंबवत्सल माणूस! ओम पुरी यांची ही विविध रूपे या पुस्तकात पाहायला मिळतील. कुटुंबातील सदस्यांबरोबरच्या गमतीदार प्रसंगांची मालिका, भारतीय आणि ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या सहवासातील अनेक धक्कादायक घडामोडी, प्रेमप्रकरणांतील रहस्य यांचा उलगडा या पुस्तकातून होईल. अतिशय दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रांचाही आस्वाद घेता येईल. मार्मिक, प्रामाणिक आणि उत्साहपूर्ण शैलीत लिहिलेली ही कहाणी म्हणजे देशातील एका गुणवंत कलाकाराच्या कार्याचा केलेला गौरव आहे. ‘सिटी ऑफ जॉय’ या चित्रपटात ओम पुरींसोबत काम केलेल्या पॅट्रिक स्वेझ या दिवंगत अभिनेत्याने त्यांचा त्याच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव पुस्तकात सांगितला आहे. प्रसिद्ध समीक्षक डेरेक माल्कम यांनी ओम यांची अफाट गुणवत्ता आणि कलेचा प्रचंड परीघ यांचा आढावा घेतला आहे. नसीरुद्दिन शाह यांनी ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’पासून सुरू झालेल्या त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या क्षितिजावर ओम पुरी या ताऱ्याचा उदय होण्याची कहाणीही पुस्तकात वाचायला मिळेल.

Quantity:
in stock
Category: