TURUNGATIL PATRE – तुरुंगातील पत्रे

SKU: 6539
Publisher:
Our Price

150.00

Product Highlights

‘मी एका ज्यू आईच्या पोटी जन्माला आलो. जर्मनीनं माझ्या शरीराचं पालनपोषण केलं. युरोपनं माझ्या आत्म्याला संस्कारसंपन्न बनवलं. धरणी हेच माझं घर आणि सारं जग हीच माझी पितृभूमी…’ अशा गौरवपूर्ण शब्दांत स्वत:विषयी प्रांजळ निवेदन करणाऱ्या अन्स्र्ट टोलरनं तुरुंगातून लिहिलेल्या छोट्या छोट्या पत्रांचा हा स्वैर अनुवाद. मागच्या पिढीतल्या एका प्रतिभासंपन्न, ध्येयवादी आणि असामान्य अशा कलावंत क्रांतिकारक आत्म्यानं लिहिलेल्या या पत्रांमध्ये कवित्व आणि कर्तृत्व या दोन्ही दृष्टींनी प्रतिबिंबित झालेलं त्याचं व्यक्तित्व जेवढं कलापूर्ण, तेवढंच जीवनदर्शीही आहे. भोग आणि त्याग, प्रतिभा आणि प्रज्ञा, विचार आणि आचार, कठोरपणा आणि कोमलपणा यांच्या संगमात न्हाऊन निघालेल्या टोलरच्या व्यक्तित्वाचं समग्र दर्शन या पत्रांतून वाचकांना घडेल.

Quantity:
in stock
Category: