₹250.00
जीवनमार्गातल्या कठीण प्रसंगांवर मात करून निर्भयपणे जीवनपथावर चालण्याचं मार्गदर्शन ‘बायबल’चा आधार घेऊन या पुस्तकात करण्यात आलं आहे. जीवनातील आव्हानांचं रूपांतर यशात कसं करावं, विचारांचं रूपांतर आचरणात करून त्यातून उत्तम फळ कसं मिळवावं, मनातले संघर्ष, सत्त्वपरीक्षा, एवढंच नव्हे; तर व्यसनांवर श्रद्धेने मात कशी करावी, हे यात सहजसोप्या भाषेत समजावले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यात सध्या सर्वांनाच भेडसावणाऱ्या नकारात्मक भावनांवर विजय कसा मिळवावा, हे तपशीलवारपणे सांगितलं आहे. पुस्तकातले भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्ती, न्यूनत्वावर विजय, संदेह-निर्भत्र्सना; तसंच नैराश्यावर मात आदी विषयांवरचे चिंतन आणि उपाय उपयुक्त व उद्बोधक आहेत.