₹395.00
२० नोव्हेंबर, १९६२ला यशवंतराव चव्हाण भारताचे `संरक्षण मंत्रिपद` भूषविण्यासाठीच दिल्लीला गेले. `हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री` या शब्दांत मराठी जनतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रीला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. चीनविरुद्ध १९६२मधील युद्धातील पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचलित बंदुका, दारूगोळा व हे सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले. त्यामुळे १९६५च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये जे काही घडले आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला, यांची उत्तरे यामध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडींचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. ……. `यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार व जाणते रणनिती विचारवंत होते….` – पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (‘१९६५ : WAR INSIDE STORY’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात)