₹280.00
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला`आवरण` म्हणतात… मला कळायला लागल्यापासून `सत्यअसत्याचा प्रश्न` हा छळणारा प्रश्न आहे… हीच समस्या `आवरण`मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे… …मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून `आपण त्यांचेच वारसदार` या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही…