₹150.00
वायू प्रदूषणाचा भस्मासूर निर्माण केला आहे मानवानेच! निसर्गावर स्वामित्व गाजविण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आणि निसर्गातील अमर्याद आणि विनाशकारी ढवळाढवळीमुळे! जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकरण, लोकसंख्येमुळे फुगत चाललेली शहरे, अमानुषपणे होत चाललेली जंगलांची कत्तल, विषारी वायू आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हा भस्मासूर एक दिवस सा-या सजीवांनाच संपवून टाकील. मग उरेल आपली पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी! वायू प्रदूषणाने जगभरातील हजारो निष्पाप लोकांचे प्राण घेतले आहेत. भोपाळ वायुकांडाची साक्ष इतिहास सतत देत राहील. वायू प्रदूषणाच्या भस्मासूराला गाडून टाकता येणार नाही का? थ्यासाठी हवी प्रबळ इच्छाशक्ती, पर्यावरणाबद्दल लोकजागृती, पर्यावरण शिक्षण, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक संस्थांचा सहभाग आणि कायद्याची कडक अंमलबजावणी.