₹100.00
आपल्या घरांना लागून असलेली घरे, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्याला मदत करणारी, आपल्याच गावातील ही माणसे आपली ‘शत्रू होतील, असे त्यांना कधी वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, ही जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथमच होत होती. हा धक्का अगदी अनपेक्षित होता. त्याने ही मंडळी ळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही.आता कशाची शाश्वती नाही.केव्हा काय होईल त्याचा नेम नाही! एका ‘वावटळी’मुळे हे सर्व घडले होते…