₹200.00
अर्जुना पंढरीची ‘वारी’ करून पुन्हा आपल्या खोपटात आला होता, …पण पांडुरंगाचं दर्शन न घेताच. जंगलाच्या वाटेवरील ‘वाटसरूं’चा कर्दनकाळ ठरणारा भाल्या धनगर, …पण एका जिगरबाज फौजदाराच्या हाती लागला. ‘तळ्या’मुळे गावचा विकास झाला, सरकारने नुकसान भरपाई दिली, …पण गावचं सगळं गेलं. उमा रामोशाने दुष्काळातही गाईचा सांभाळ केला, …पण दारूच्या नशेत त्याच्या हातून ‘पाप’ घडलं. वीस वर्षे जे कुटुंबाचे दु:ख होते, तेच त्या बहिणीचेही दु:ख होते, …पण आज एकाएकी ती श्रीमंत झाली होती. रेल्वेतनं येताना एका आंधळ्याची ‘सोबत’ होती, …पण तरीही मंजुळा घरी पोहोचली नाही. ‘जन्मगाठी’च्या बंधनात अडकण्यास रंगनाथ तयार झाला होता, …पण त्याने जन्मात लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अर्जुना, भाल्या, उमाजी, भालू, मंजुळापासून… रंगनाथपर्यंत ‘वारी’तील वारकऱ्यांचा हा जीवनप्रवास!