₹100.00
वि. स. खांडेकर हे ललित लेखक होते तसेच गंभीर समाजिंचतकही होते. त्यांच्या समग्र साहित्यास समाजिंचतनाची किनार अंगभूत असायची. केवळ रंजक लिहिणं खांडेकरांची वृत्ती नव्हतीच मुळी! विशुद्ध वैचारिक लेखन ते तन्मयतेने करायचे. त्यात नवसमाज निर्मितीचा ध्यास असायचा. त्यांचे समाज चिंतनपर वैचारिक लेख म्हणजे अपरासृष्टीच! गांधीवाद, समाजवादाधारित मानव समाज निर्मिती हे त्यांचं बिलोरी स्वप्न होतं. त्यांच्या कल्पनेतला नवा भारत विज्ञाननिष्ठ, समताधिष्ठित, श्रमप्रतिष्ठ, स्वदेशभावयुक्त, आंतरिक शुचितेने भारलेला असायचा. नवी स्त्री केवळ शिक्षित नव्हती तर सुजाण होती. सामान्यजन नैतिकता, न्याय व कृतिशीलतेस आसूसलेले ते कल्पायचे. नवा भारत घडवायचा तर निर्मितीचा वन्हि चेतायलाच हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. खांडेकरांची ही अपरासृष्टी समजून घ्यायची तर ‘वन्हि तो चेतवावा’तील वैचारिक लेख वाचायलाच हवेत. त्या शिवाय आपण नवा भारत निर्मिणार तरी कसा? नि केव्हा?