₹230.00
वि. स. खांडेकर यांनी ते ‘वैनतेय’ साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं, त्यातील ‘वाङ्मयविचार,’ ‘पुस्तक परिचय’ आणि ‘वार्तापत्रे’ या सदरांतील लेखनाचा अंतर्भाव ‘वाङ्मयविचार’ या पुस्तकात केला आहे. मराठी व इंग्रजी या भाषांतील साहित्य व नियतकालिकं ते नित्य वाचत. अशा वाचनाच्या अनुषंगाने मनात निर्माण झालेले विचार, प्रतिक्रियांची नोंद खांडेकर `वाङ्मयविचार` सदरात करताना दिसतात. ज्याला पुस्तकपरिचय, परीक्षण, टीका, समीक्षा म्हणता येईल, अशी दोन सदरं वि. स. खांडेकरांनी `वैनतेय` साप्ताहिकात लिहिल्याचं दिसून येतं. त्यापैकी एक होतं ‘पुस्तक परिचय.’ परीक्षणं ही `साहिाQत्यक-संपादक` म्हणून आलेल्या औपचारिक जबाबदारीची परिपूर्ती असायची. ‘वार्तापत्रं’मध्ये तत्कालीन विविध विषयांवरील वार्तापत्रांचा समावेश आहे.