₹240.00
वेदना आणि व्याधींसह चांगलं जीवन’ हे एक प्रेरणादायी आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे. सजगता आणि एका वेळी तेवढ्याच क्षणापुरतं जगणं यांद्वारे जुनाट वेदना आणि व्याधी कशा ताब्यात ठेवाव्यात, हे या पुस्तकात सांगितलं आहे. पुरातन सजग ध्यानाची परिणामकारकता अलीकडच्या काळात जगन्मान्य झाली आहे. विशेषत: आरोग्य आणि तणाव यांबाबतीत वेदना आणि ध्यान या आपल्या वयक्तीक अनुभवातून विश्वास देणा-या या पुस्तकामध्ये विद्यामाला बर्च यांनी डॉ. जॉन कबाट-झिन आणि इतर यांचं काम पुढे नेलं आहे. आरोग्याच्या कोणत्याही तक्रारींसह सजगतेने जगणं शिकल्यामुळे आत्मविश्वास, शहाणपण आणि दयाळूपणा कसा मिळतो, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. विद्यामाला यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमाने हजारो व्याधिग्रस्तांना अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत केली आहे. तुमच्या शरीराची शांत आणि सजग जाणीव प्रत्येक क्षणी निर्माण केल्यामुळे, वैफल्य आणि दु:ख नाहीसं करणं शक्य आहे, हे त्या दाखवून देतात. जुनाट वेदना आणि व्याधी यांच्या दुय्यम आणि भावनिक परिणामांना योग्य रीतीने हाताळून तुम्ही अधिक सकारात्मक जगू शकता. सहज करण्याजोग्या श्वसनाच्या पद्धती, सामथ्र्यशाली सजग ध्यानप्रकार, उपयुक्त आकृत्या आणि यांपासून फायदा झालेल्या व्यक्तींचे प्रेरणादायी अनुभव यांचा समावेश ‘वेदना आणि व्याधींसह चांगलं जीवन’ या पुस्तकात आहे. व्याधिग्रस्तांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. जन्मजात दौर्बल्य, एक अपघात आणि अनेक शस्त्रक्रिया यांमुळे होणा-या दीर्घकालीन पाठदुखीपासून तीस वर्षांपेक्षा अधिक काळ विद्यामाला बर्च वेदनाग्रस्त आहेत. आता त्या व्हीलचेअर वापरतात. ‘ब्रेथवक्र्स ऑर्गनायझेशन’ या मान्यवर संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत. दीर्घकालीन वेदना, व्याधी आणि तणाव अनुभवत असणा-या व्यक्तींना स्वत:ची परिस्थिती ध्यान, शरीराची जाणीव आणि सकारात्मक प्रवृत्ती यांद्वारे काबूत ठेवून जगण्यास ही संस्था मदत करते.