₹280.00
महाकवी सोमदेव यांनी सुमारे 2500 वर्षांपूर्वी संस्कृत भाषेत ‘बेतालपंचविंशतिका’ग्रंथाची निर्मिती केली. यावर आधारित कथा म्हणजेच विक्रम-वेताळच्या सुरस कथा होय. शतकानुशतके या कथा भारतीय परीकथांचा अविभाज्य घटक म्हणून गणल्या जातात. उज्जैनचा सम्राट राजा विक्रम त्याच्या राज्यातील एका साधूला वेताळाला घेऊन येण्याचं वचन देतो. वेताळ राजासोबत यायला तयार होतो, पण वेताळाला नेताना राजानं संपूर्ण मौन बाळगण्याची अट घातली जाते. राजानं एखादा शब्दही उच्चारल्यास वेताळ उडून पुन्हा आपल्या मूळस्थानी जाणार असतो. राजा वेताळाला घेऊन जाण्यासाठी सज्ज होताच वेताळ गूढ कोडयांमध्ये रचलेल्या सुरस गोष्टी सांगू लागतो. प्रत्येक गोष्टीच्या अखेरीस वेताळ राज्यासमोर गोष्टीतलं कोडं मांडतो आणि राजा विक्रमला आपलं मौन सोडावं लागतं. वेताळानं सांगितलेल्या या रमणीय परीकथांची मालिका म्हणजेच या विक्रम-वेताळाच्या गोष्टी. या सर्व गोष्टींच्या अखेरीस बुद्धीला आव्हान देणारं एखादं गमतीदार कोडं लपलेलं असतं, जे मुलांचा गोष्टीतला रस वाढवतंच, शिवाय त्यांना त्या कथांशी एकरूपही करतं.