₹120.00
‘…कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात. प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ते सहजगत्या कानांवर पडलेल्या चारदोन ओळींच्या एखाद्या घटनेपर्यंत… अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना व विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत… या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’