₹180.00
विज्ञानइतिहासाची पाने ही शास्त्रज्ञांच्या जीवनकथांनी आणि शोधांच्या रंजक कथांनी नटली आहेत. साध्या सेफ्टी पिनपासून अणुबाँबपर्यंत अनेकविध जे शोध लागले, ते संशोधकांच्या– शास्त्रज्ञांच्या परिश्रमांची, चिकाटीची आणि मुख्यत: त्यांच्या प्रतिमेची साक्ष पुरवितात. विज्ञानइतिहासातील अशीच काही पाने उलगडून दाखविण्याचा हा प्रयत्न. या पुस्तकात लिओनार्दो द विंची या प्रख्यात चित्रकारातील संशोधक भेटेल, नोबेल, पॉलिंग, साखारॉव्ह, भटनागर हे संशोधक-शास्त्रज्ञ भेटतील, तसेच अॅस्पिरीनपासून विजेच्या दिव्यांपर्यंत अनेक शोधांच्या रंजक कथा वाचायला मिळतील. विज्ञानातील हे सारे ‘सरस’ तितकेच ‘सुरस’ही आहे. ते तितक्याच रंजक पद्धतीने मांडलेले या पुस्तकात आढळतील.