₹100.00
काही मुलांना विज्ञान हा कंटाळवाणा किंवा रुक्ष विषय वाटतो; पण अशा मुलांना सोप्या भाषेत, सप्रयोग विज्ञानातील गमती सांगितल्या तर त्यांनाही विज्ञान आवडू लागेल आणि जी मुलं विज्ञानप्रेमी आहेत त्यांनाही आवडतील अशा प्रयोगांची सचित्र माहिती देणारं पुस्तक आहे ‘विज्ञानातील रंजकता.’ विज्ञानातील रंजक प्रयोगांची माहिती देणारं हे पुस्तक आहे. डोलणारा ससा, जादूची चकती, डोलणारा विदूषक, लपणारा उंदीर, उडणारे बूच, अखंड फिरणारे चुंबक असे मुलांना आवडणारे प्रयोग या पुस्तकात अंतर्भूत केले आहेत. खरं साबणाचे कार्यसारखा प्रयोग असो किंवा चुंबकसुईचा, विद्युत जनरेटरचा प्रयोग असो किंवा आद्र्रतामापक यंत्राचा, हे सगळे प्रयोग मुलांना आवडणारे आणि सहज करण्यासारखे आहेत. या प्रयोगांमध्ये वैविध्य आहे. पालकांनी मुलांना हे पुस्तक वाचायला उद्युक्त करावे. यातील प्रयोग साध्या, सोप्या भाषेत सांगितलेले असल्यामुळे आणि आपल्याजवळील उपलब्ध साहित्यातून होत असल्यामुळे ते प्रयोग मुलं नक्कीच करून पाहतील, त्यात रमतील आणि आनंद मिळवतील.