VISHWASATTA – विश्वासता

SKU: 6204
Publisher:
Our Price

380.00

Product Highlights

खाली ठेवलेल्या त्या गो-या माणसाकडे एकदा नजर टाकून उपमठाधिपती स्वत:शीच बोलल्यासारखे पुटपुटले, ‘`… पण खरं म्हणजे इथं पिमाकोपर्यंत एक पाश्चिमात्य माणूस आला तरी कसा?’’ मठाधिपती बोलू लागले. त्यांचा आवाज बारीक आणि उदासीन होता. ‘‘आपल्या मठाचे अस्तित्वच नष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत. रात्र होईपर्यंत माझे निधन झालेले असेल आणि आपला मठ उद्ध्वस्त झालेला असेल. या निबिड अरण्यातून महाभयंकर, क्रूर शक्ती झडप घालण्यासाठी येत आहेत.’’ एक पवित्र वस्तू हस्तगत करण्यासाठी तिबेटमधल्या एका मठावर चिनी सैनिकांनी धाड टाकली आहे. प्राणरक्षणासाठी तिथल्या भिक्षूूंनी जंगलात दडलेल्या गुहांकडे धाव घेतली आहे, पण एका परक्या जखमी माणसामुळे त्यांची वाटचाल म्हणावी तशी वेगाने होत नाही आणि तो माणूस बरोबर असण्याने त्यांच्या सगळ्यांच्याच जिवाला धोका उत्पन्न झाला आहे. पत्रकार नॅन्सी केलीच्या नावाने एक पार्सल येते. त्यात एक रहस्यमय असे हाड कोरून बनवलेली तुतारी असते आणि एका पाश्चिमात्य माणसाने जिथे ऑर्किड्सच्या फुलांचे गालिचे जमिनीवर पसरलेले आहेत, उंच डोंगरांंना उंचच उंच जाणा-या छतांचे पॅगोडा मिठी मारून बसलेले आहेत आणि जिथे प्रार्थनामंदिरांचे उंच कळस जमिनीच्या गर्भात दडलेले आहेत अशा तिबेटच्या घनदाट जंगलात कुठंतरी दडलेल्या एका राज्यात प्रवेश केल्याचे वर्णन असते. लवकरच तीदेखील एका कालातीत रहस्याचा शोध घेण्यासाठी अद्भुत दंतकथा आणि आख्यायिकांच्या भूप्रदेशातल्या एका धोकादायक प्रवासाला निघते…

Quantity:
in stock
Category: