₹320.00
मीरा, सुंदर मीरा, हंसिनी मीरा, कॉर्पोरेट पत्नी आणि पाकशास्त्राच्या पुस्तकांची लेखिका या दोन भूमिकांमध्ये बुडून गेलीये. मग एक दिवस तिचा नवरा घरी परतत नाही. एका रात्रीत मीरा, उद्ध्वस्त मीरा, भावनाप्रधान हळवी मीरा— तिची मुलं- नयनतारा आणि निखिल- एवढंच नव्हे, तर तिची आई सारो, तिची आजी लिली आणि त्यांच्या बंगळुरूमधल्या मोडकळीला आलेल्या गुलबक्षी घराचा कारभार— या सर्वांची जबाबदारी घेते. काही रस्ते पलीकडे राहणा-या प्रोफेसर जे. ए. कृष्णमूर्ती ऊर्फ जॅक– एक हवामान व वादळ-तज्ज्ञ, घटस्फोटित आणि अनेक बाकीच्या संबंधांतून बाहेर पडलेला, नुकताच फ्लोरिडाहून परतलाय. त्याच्या घरातल्या बेडरूममध्ये त्याची एकोणीस वर्षीय मुलगी स्मृती एका आठवणींच्या आणि गतकाळातल्या बलात्काराच्या मूर्तिमंत दु:खद रूपात लोळागोळा होऊन पडली आहे. तामीळनाडूच्या समुद्रकाठच्या एका छोट्या गावात तिच्यावर अशी वेळ यावी, असं काय घडलं? पोलीस मदत करत नाहीत, स्मृतीचे मित्र-मैत्रिणी नाहीसे झालेत आणि एक स्तब्धता आणि भयाची भिंत या घटनेला घेरून आहे; पण जॅक सत्य शोधून काढेपर्यंत विश्रांती घेऊ शकत नाही. योगायोगांच्या साखळीमुळे मीरा आणि जॅकची आयुष्यं एकमेकांत गुंतली, गुंफली जातात; वादळाच्या अनिश्चिततेसारखी आणि अटळपणे आणि जसे दिवस सरतात, तशी नवीन सुरुवात प्रकटते, जिथे फक्त अंतच असावा, असं वाटतं तिथे. वादळाच्या स्थितींना प्रतिध्वनित करत रेखलेली ‘लेसन्स इन फरगेटिंग’ ही कादंबरी एक मुक्ततेची, क्षमाशीलतेची आणि पुनर्संधीची हृदयस्पर्शी कहाणी आहे.