YUVRADNEE – युवराज्ञी

SKU: 6183
Publisher:
Our Price

180.00

Product Highlights

एका सौदी अरेबियन राजकुमारीला मनश्चक्षूंसमोर आणा, काय दिसतं तुम्हाला? चमचमत्या हिरेमाणकांनी मढलेली, विश्वास बसणार नाही अशा ऐशाआरामात राहणारी स्त्री; पण प्रत्यक्षात मात्र सोनेरी मुलामा चढवलेल्या पिंज-यात राहणारी. तिला स्वातंत्र्य नाही, स्वत:चे मत नाही, स्वत:च्या आयुष्यावर अधिकार नाही; फक्त पुत्र जन्माला घालणारी एवढीच तिची किंमत. सुलताना ही सौदी राजघराण्यात जन्माला आलेली, राजेसाहेबांची अगदी निकटवर्ती. आपल्या वादग्रस्त बाल्यापासून नियोजित विवाहापर्यंत आयुष्याबद्दल सांगताना ती बुरखा बाजूला सारून – स्त्रियांचे निर्घृण छळ, तसेच सक्तीचे विवाह, लैंगिक गुलामगिरी व तत्काळ देहान्तशासन यांसारख्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणा-या घटनांचा धक्कादायक इतिहास उघड करते. ‘प्रिन्सेस’ ही स्त्रीच्या निर्भीड वृत्तीचा आणि प्रचंड साहसाचा पुरावा आहे. सुलतानाने स्त्रियांच्या अत्याचाराविषयी स्पष्टपणे बोलून स्वत:च्या आणि आपल्या मुलांच्या माथी सौदी समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. याच कारणास्तव तिने तिची कहाणी अनामिकपणे सांगितली आहे. मानवी हक्कांची किमान जाणीव असलेल्या कुणाचेही काळीज पिळवटून टाकेल असेच हे पुस्तक आहे. एक अत्यंत प्रभावीपणे लिहिलेली खासगी कथा जी तिथल्याच स्त्रीकडून आल्यामुळे, विश्वसनीय ठरलेली! – बेट्टी महमूदी (‘नॉट विदाऊट माय डॉटर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाची लेखिका.)

Quantity:
in stock