₹170.00
धकाधकीच्या आयुष्यात ‘विरंगुळा’ शोधणारे तात्या…. ओढग्रस्त परिस्थितीत विठोबाला दिलासा देणारा ‘पाऊस’…. आयुष्याच्या शेवटापर्यंत भिकुची पाठ न सोडणारे त्याचे ‘भोग’…. लग्नात आडकाठी आणणारा बुधाच्या आयुष्यातील ‘धोंड्याचा महिना’…. औषधांचा खुराक खाण्यासाठी मधूचा ‘आजारी पडण्याचा प्रयोग’…. एका दिवसाच्या भाकरीचा प्रश्न सोडवणारं ‘गवत’…. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आयुष्यातील आनंद शोधणारी सामान्यातील असामान्य माणसं! द. मा. मिरासदारांनी आपल्या खासशैलीत रेखाटली आहेत. ती आपल्याला ‘विरंगुळ्या’चा क्षण देऊन जातात.