₹110.00
काही मुलांना विज्ञान हा कंटाळवाणा किंवा रुक्ष विषय वाटतो; पण अशा मुलांना सोप्या भाषेत, सप्रयोग विज्ञानातील गमती सांगितल्या तर त्यांनाही विज्ञान आवडू लागेल आणि जी मुलं विज्ञानप्रेमी आहेत त्यांनाही आवडतील अशा प्रयोगांची सचित्र माहिती देणारं पुस्तक आहे ‘विज्ञानातील गमती.’ बाटलीतील कारंजे कसे तयार करायचे हे तर त्यांनी सांगितले आहेच. शिवाय परावर्तनाची गंमतही एका प्रयोगाद्वारे सांगितली आहे. गरगर फिरणारी बाटली, न फुगणारा फुगा, जादूचे फूल, रंगीत कारंजे, अदृश्य होणारे नाणे, सरकणारे नाणे हे प्रयोग तर मुलांना आवडतील असेच आहेत. सेफ्टी फ्यूजचे कार्य, विद्युत प्रवाह दर्शक, बटण, बझर आणि बॅटरी असे इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित प्रयोगही सांगितले आहेत. घरगुती होकायंत्र कसे तयार करावे याचीही माहिती मुलांना या पुस्तकातून मिळेल. एकूणच या पुस्तकातील सगळे प्रयोग मुलांना आवडतील असेच आहेत. पालकांनी मुलांना हे पुस्तक वाचायला उद्युक्त करावे. यातील प्रयोग साध्या, सोप्या भाषेत सांगितलेले असल्यामुळे आणि आपल्याजवळील उपलब्ध साहित्यातून होत असल्यामुळे ते प्रयोग मुलं नक्कीच करून पाहतील, त्यात रमतील आणि आनंद मिळवतील.