₹130.00
संत्या फारच अस्वस्थ झाला होता. धमन्याने जातपंचायतीचा घोर अपमान केला आहे, असेच त्याला वाटत होते. तेथील सर्वच माणसांत कुजबूज सुरू होती. एखाद्या हडळिणीकडे बघावे, तसे बायका, मुलं लच्छीकडे बघत होती. लच्छीच्या चेहNयावर मात्र समाधान दिसत होते. संत्या नीट सावरून बसला. खाकरून त्याने घसा साफ केला आणि निर्णय देऊ लागला, ‘‘धमन्या व लच्छीनं जातीला काळं फासाचं काम केलंय… जातपंच्यातीचा आवमान केलाय… गुलब्याचं पयसं घेतलं ती घेतलं… आणिक बायवूÂबी घरात ठिवून घितली… उंद्याच्याला आपल्या जातीत आसच व्हुया लागलं तर… येकमेकांच्या सबदावर कोण सुदीक इस्वास ठिवणार न्हाय.. परत्येक घरातील बाया, माणसं… मनाला यील तसं वागत्याली… ही जातीच्या हिताचं न्हाय… तवा धमन्यानं… आपलं पाल… आशील त्या… सामानसुमानासकट… गुलब्याच्या ताब्यात देवावं… आणिक