₹200.00
छोटेसे बदल तुमच्या मन:परिवर्तक शक्तीत मोठा बदल करू शकतात. – लेखन साहित्यातील कोणत्या वस्तू, इतरांचे मन:परिवर्तन प्रकर्षाने करण्याचे तुमचे प्रयत्न, अधिक परिणामकारक ठरू शकतात? – तुमच्यातील मन:परिवर्तकता इतरांपेक्षा ५०ज्ञ् ने वाढविण्यासाठी तुम्ही आज कोणता एक शब्द वापरण्याची सुरुवात करू शकता? – कारणावली दिल्यानंतर लोक `मर्सिडीज’ची निवड करतील; की लोक बीएमडब्ल्यू पसंत करतील? – आणि बहुतांश `डेन्टिस्ट’ हे डेनीस का म्हणविले जातात? तुमच्या सहकाऱ्यांनी तुमच्याशी अधिक वेळा सहमत होणे, तुमच्या पाल्यांनी गृहपाठ करणे आणि शेजाऱ्यांनी तुमच्यावर कचरा न टाकणे हे बहुतेक तुम्ही निश्चितपणे पसंत कराल. `आपल्याला हवे ते इतरांनी करावे’ असे मन:परिवर्तन करण्याच्या आवाहनास आम्हाला रोजच सामोरे जावे लागते. पण लोक कशामुळे आपल्या विनंतीस `होकार’ देतात? मन:परिवर्तनाच्या मानसशास्त्रावर ६० वर्षांपासून केलेल्या संशोधनाच्या आधीन राहून या पुस्तकात बऱ्याच लक्षणीय अंतरंगाच्या यथार्थ ज्ञानाचा उलगडा केला आहे. त्याचा निश्चितच तुम्हाला घर व कार्यालय दोन्ही ठिकाणी अधिक मन:परिवर्तन होण्यासाठी मदत होईल. `प्रभाव’ या विषयाचे तज्ज्ञ म्हणून जगात ज्यांचा संदर्भ दिला जातो असे प्रोपेÂसर रॉबर्ट सियाल्दीनि याच्या साहचर्याने लिहिलेल्या `येस!’ या पुस्तकातून वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या मन:परिवर्तनाच्या अनेक सूचना दिल्या आहेत, ज्या तुमच्या मन:परिवर्तन शक्तीस पुष्टी देतील त्या गमावणे तुम्हाला नक्कीच आवडणार नाहीत. एखाद्याला त्याचे औषध घेण्यासाठी असो, त्याचा रस्ता कमी करावयाचा असो िंकवा त्याला मत देण्यासाठी असो, तुम्हाला जर प्रेरित करावयाचे असेल तर, ‘येस!’ने तुमच्या विनंतीत छोटेसे बदल केल्यामुळे तुमच्या यशात कसे नाट्यपूर्ण परिणाम होऊ शकतात, हे दाखवून दिले आहेत.