₹110.00
आकर्षक रंगरूपाच्या, नानाविध आकारांच्या माशांचे चित्रविचित्र विश्व पाहून कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही. चपटे, साळिंदरसारखे काटेरी, चेंडूसारखे गोल, तर काहींचा आकार चक्क पेटीसारखा! काही सापासारखे लांब! हत्तीच्या सोंडेसारखे तोंड असलेले हत्ती मासे, वटवाघळासारखा आकार असलेले वटवाघूळ मासे, घोड्याच्या तोंडाच्या आकारासारखे घोडतोंड्या मासे तसेच समुद्री ड्रॅगन पाहून निसर्गाच्या चमत्काराचे आश्चर्य वाटते! आंधळे मासे, सूर्याच्या आकाराचे सूर्य मासे, आयुष्यभर परावलंबी जीवन जगणारे परजीवी रेमूरा मासे, भक्ष्यापुढे आमिषाचा गळ टाकून त्याला लीलया फस्त करणारे गळ मासे, विजेचा शॉक देणारे मासे, विंचवासारखा दंश करणारे विंचू मासे, आवाज करणारे मासे असे सर्व मासे पाहिले म्हणजे निसर्गाच्या किमयेचे कौतुक वाटते. अशा या अद्भुत, वेधक, मनोरंजक व विस्मयकारक माशांच्या अनोख्या सृष्टीची माहिती वाचकांना नक्कीच आवडेल.