₹295.00
`निद्रिस्त महाशक्ती’ असे ली कुआन यू यांनी भारताचे वर्णन केले होते. समाजवादाची नशा ओसरल्यामूळे, सुदैवाने भारत दीर्घ निद्रेतून हळूहळू जागा होत आहे. त्यामूळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय पटावर आपले न्याय्य स्थान संपादन करील,असा विश्वास वाटतो. भारताचे दुखणे काय आहे, त्याच्यापाशी केवढी उदंड क्षमता आहे, त्याला केवढा वैभवशाली वारसा लाभलेला आहे, इतिहास आणि निसर्ग या दोन्ही बाबतींत तो किती समृध्द आहे, याचे अत्यंत मार्मिक विवेचन या पुस्तकात करण्यात आलेले आहे. भारताच्या उदात्त राज्यघटनेपासून, या देशाला वेळोवेळी भेडसावत गेलेल्या माननिर्मित समस्यांपर्यंत अनेक विषयांचा वेध लेखकाने आपल्या अजोड बुध्दिमत्तेच्या बळावर अचूक रीतीने घेतला आहे. पालखीवाला यांनी केवळ समस्यांचेच सूचन केले आहे. असे नाही; आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यासंगाच्या आणि विविध क्षेत्रांतील सखोल अनुभवाच्या आधारे त्यांच्या सोडवणुकीची दिशाही सांगितली आहे. जो देश इतिहास विसरतो, त्याच्या नशिबी त्या इतिहासाची पुनरावरावृत्ती अनुभवण्याची वेळ येते, असे सर्वच विचारवंत मानतात. त्या दृष्टीनेच पालखीवाला यांनी गेल्या सहा वर्षांच्या वाटचालीसंबंधी या ग्रंथात मागोवा घेतला आहे. थोडक्यात सांगायचे, तर सर्व व्यक्तींना सर्व प्रसंगी उपयुक्त ठरते, असे हे पुस्तक आहे.