₹140.00
आजच्या आपल्या जीवनपद्धतीचा आपल्या मनावर जो परिणाम होत आहे, त्यासंबंधी विचार मांडून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न लेखिकेनं या पुस्तकात केला आहे. आज समाजातल्या सर्व थरांतली माणसं मानसिक ताणतणावाखाली वावरताना दिसतात; घरात आणि बाहेर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना मनानं थवूÂन जातात. मात्र लेखिकेच्या मते, हा ताण कमी करणं आणि आयुष्य अधिक सुखद व आनंदमय करणं, हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती असतं. हे कसं साध्य करायचं? सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि ‘ताण व आनंद’ या विषयाचे सल्लागार डॉ. रिचर्ड काल्र्सन यांचे विचार व लेखिकेचे स्वत:चे विचार यांची गुंफण करून लिहिलेले हे पुस्तक वाचकांना निश्चित नवी दिशा देणारे ठरेल.