₹230.00
गुंतवणूक तसंच शेअरबाजार यांच्यात रस असलेल्या माणसाला ‘वॉरन बफे ’ हे नाव माहीत नसणे, हे केवळ अशक्य आहे. गेली कित्येक दशक बफेनं गुंतवणुकीच्या विश्वात मिळवलेलं यश अफाट आहे. शेअरबाजाराच्या चढ-उतारांवर सातत्यानं मात करून प्रचंड वेगानं त्यानं आपल्या वैयक्तिक संपत्तीत तर भर घातलीच आहे; पण शिवाय आपल्या ‘बर्वशायर हॅथवे’ या कंपनीमधल्या शेअरधारकांनाही कोट्यधीश केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतके पैसे कमावणा-या आणि जागतिक पातळीवरच्या सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचलेल्या या माणसाला पैशांचा उपभोग घेण्यामध्ये अजिबात रस नाही. त्याचं राहणीमान अत्यंत साधं आहे आणि पैसे विनाकारण खर्च करण्याचा त्याला साफ तिटकारा आहे. अतिशय काटकसरी वृत्तीनं राहणा-या बफेनं आपली जवळपास सगळी संपत्ती सामाजिक कामांसाठी खर्च करण्याचं जाहीर करून सगळ्या जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आपल्या कारकिर्दीत कधीही नीतिमत्ता सोडून न वागलेल्या बफेचं माणूस म्हणून महत्त्व याचसाठी खूपच जास्त आहे. अशा या विलक्षण माणसाच्या अफाट आयुष्याची आणि त्याच्या गुंतवणुकीच्या रहस्यांचा उलगडा करणारी ही सफर!