₹120.00
खांडेकरांच्या कथा केवळ नादमधुर भाषा व तिचे चिमणे नृत्य यांतच अडकलेली नाही, तर तिला भव्यता, आर्तता, उदात्तता आणि सजीवता यांचा ध्यास आहे. या सगळ्या गुणांचा संगम या संग्रहातल्या कथांमध्ये झालेला दिसतो. त्यात एक वेगळेच सजीव सौंदर्य दिसते. जीवनाची गगनभेदी हाक ऐकण्याची आतुरता आणि मग व्यक्त करण्याची उत्कटता यांचा सुरेख मेळ यांत झालेला आहे. जगण्याची विविध अंगे कवेत घेऊ पाहणाया या कथांचा गाभा चिंतन तन आणि अंतर्दृष्टी देणारा असा आहे. या कथांमधून खांडेकरांनी जुन्या चाकोरीच्या वाटा मोडून नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केला आहे हे स्पष्टपणे दिसून येते.