₹60.00
आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाहुती दिल्या. आपलं सर्व आयुष्य खर्ची घातलं. स्वातंत्र्य चळवळीच्या या यज्ञकुंडात गांधीजी, नेहरू, टिळक, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या अनेक थोर नेत्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाची, अशा आकांक्षांची आहुती दिली. ती केवळ आपल्या स्वप्नातला आदर्श भारत उभा राहावा म्हणून… पण आजच्या पिढीसाठी त्यांचा व्यक्तिगत उत्कर्ष आणि स्वार्थच महत्त्वाचा आहे. देशप्रेमाचं हे यज्ञकुंड असंच धगधगत राहणार की विझून जाणार? खांडेकरांच्या सहजशैलीतील या कुमारांसाठीच्या कथा प्रौढांनाही अंतर्मुख करतील!