₹295.00
या पुस्तकात कमीत कमी कष्टात अधिक श्रम कसे करता येतील याविषयी चर्चा केली आहे. परंतु कष्ट कमी करायचे असतील तर त्यासाठी प्रथम आपण कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च करतो याचा विचार करावा लागेल. त्याकरीता आपला दिनक्रम कसा आहे, याचा आधी विचार करावा लागेल. आपल्या दिनक्रमात असणाऱ्या चुका शोधण्यात मदत करण्यासाठी पुस्तकात तालिकांचा समावेश केला आहे. त्या तालिकांच्या आधारे कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च होतो व तो वेळ योग्य ठिकाणी कसा वापरता येईल, वेळेचे सुव्यवस्थापन कशा पद्धतीचे असावे याची चर्चा पुस्तकात केली आहे. त्याचप्रमाणे कामाचे नियोजन व उद्दिष्ट निश्चिती वरही लेखकाने भर दिला आहे. उद्दिष्ट कशी निश्चित करावीत, दीर्घकालीन उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट, कामाच्या संदर्भातील उद्दिष्ट, वैयक्तिक संदर्भातील उद्दिष्ट असे उद्दिष्टांचे वर्गीकरण करून त्यानुसार नियोजन कसे करावे हे सांगितले आहे. कामाबरोबर वैयक्तिक आवडीनिवडी, आरोग्य, कुटुंब यांना योग्य पुरेसा वेळ कसा देता येईल? यांचाही विचार केला आहे. कामाबरोबरच येणारा ताण उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या मदतीने कसा टाळता येईल याचेही विवेचन पुस्तकात आले आहे. नकारात्मकता, चिडचिडेपणा, कामात दिरंगाई या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जरी उद्दिष्ट ठरवली तरी त्यांना अति महत्त्व न देता योग्य विश्रांती (ब्रेक) घेऊन त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे. एकूणच योग्य वेळ व्यवस्थापन, कामाचे योग्य नियोजन यांच्या मदतीने कमी कष्टात अधिक श्रम हे ध्येय साध्य करणे निश्चितच सोपे आहे.