₹170.00
‘पृथ्वीवर येणाऱ्या युगारंभीच्या पहिल्या वसंत ऋतूच्या पाऊलस्पर्शासारखी ती त्याला भासली. तिचं धडधडतं हृदय त्याच्या कानापाशी होतं… जगाच्या आरंभी सुरू झालेला ताल. काळाला स्पर्श करत सतत युगानुयुगे सनातनपणे चाललेला धिनतिक. या तालातूनच निर्माण झालेली सृष्टीची लयकारी… त्याला आदिताल सापडल्यासारखं वाटलं.’