₹100.00
स्त्रियांनो, हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. या लेखनाची शैली आहे अनौपचारिक, गप्पा मारल्यासारखी. यातून लेखिका विनोदी शैलीत तिच्या आयुष्यात घडलेले घटना-प्रसंग तुमच्याशी शेअर करते, गंभीर विषयांना हात घालते. हे शेअरिंग करताना प्रत्ययास येणारा तिचा हजरजबाबीपणा आणि शहाणपणा अचंबित तर करतोच, पण अंतर्मुखही करतो. एके ठिकाणी ती म्हणते, ‘प्रत्येकाकडे त्याची अश्लीलता असते आणि रिअल इस्टेटच्या जाहिराती हे माझं अश्लील साहित्य आहे!’किंवा ‘माता या एक नैसर्गिक शक्ती आहेत आणि पर्यायी इंधनही!’ सूज्ञ, चटपटीत, संवेदनशील, विनोदी, तसंच चटका लावणारं, प्रेमाने हळुवारपणे स्पर्श करणारं हे पुस्तक आंबट-गोड-तिखट अशा विविध चवीच्या पदार्थांची मेजवानी आहे!