₹140.00
स्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात ह्याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत; आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरुष का करत नाहीत. ह्याचे कारण म्हणजे, स्त्री व पुरुष वेगळे आहेत. ते समान पेशींपासून बनलेले आहेत, एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे. पण हे दोघे वेगवेगळ्या जगात रमतात. त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात, पण फारच थोडे पुरुष हे मान्य करतात. एक सामायिक गोष्ट अशी की स्त्री व पुरुष कुठल्याही धर्माचे, पंथाचे, वर्गाचे असले तरी त्यांचे दृष्टिकोन व विश्वास सारखेच असतात.