₹480.00
प्रचंड गर्दी आणि गजबजाटाच्या आयुष्याला कंटाळलेली वकील जोसलीन कोल शांतता आणि एकान्त शोधण्यासाठी वॉशिंग्टन राज्यात स्थायिक होते… एक नवा व्यवसाय उभारण्याच्या कामात मदत करायला वकील शोधत डीन बेल्डन जोसलीनच्या ऑफिसमध्ये येतो. काही दिवसांत डीनला ग्रँड ज्यूरींसमोर साक्षीसाठी उभे राहावे लागते; पण अचानक त्याचा मृत्यू होतो… अणुविभाजन विषयातील तज्ज्ञ गिडियन रे एका गंभीर गोष्टीने अस्वस्थ होतो. रशियात दोन अणुबाँबचा शोध लागत नसतो आणि ते नकली चलनावर ‘बेल्डन इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीच्या पत्त्यावर पाठवलेले असतात. याचा तपास घेण्यासाठी गिडियन पोहोचतो बेल्डनची कंपनी स्थापन करणाऱ्या वकील जोसलीनकडे! यातून उलगडत जाते एक उत्कठावर्धक – प्रचंड संहार करणाऱ्या अणुबाँबची आणि हीन दर्जाच्या राजकारणाची!