₹495.00
झुबेदा- बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात मोलाची कामगिरी केलेल्या, एका लब्धप्रतिष्ठित जोडप्याची दत्तक मुलगी. आपल्या जन्मदात्यांची पाळेमुळे जाणून घेण्याचा पराकोटीचा ध्यास घेऊन आत्मशोधाच्या प्रवासाला निघालेल्या झुबेदाची ही कहाणी. झुबेदा हार्वर्ड युनिव्हर्सिटीत जीवशास्त्राचे शिक्षण घेत असते. इथेच तिची एलिजा या तरुणाशी गा` पडते आणि ती त्याच्या प्रेमात पडते. शिक्षणादरम्यान उत्खननाची संधी मिळालेली असतानाही, ते काम अर्धवट सोडून तिला मायदेशी परतावं लागतं. निराश मनःस्थितीत कुटुंबाच्या दबावाखाली तिला बालमित्राशी- रशीदशी लग्न करावं लागतं. आपल्या जन्मदात्यांच्या शोधासाठी. झुबेदाला कोणत्या दिव्यातून जावं लागतं आणि तिला त्यासाठी नात्यांनाही कसं पारखं व्हावं लागतं, याचं वास्तव चित्रण करणारी कादंबरी आहे, ‘द बोन्स ऑफ ग्रेस.’