₹140.00
एका क्षणात बाईसानं त्याला कवेत घेतलं. त्यांच्या कुशीत राधो शिरला, आणि बाईसांचं मन मायेच्या पहिल्या आवेगानं भरून गेलं. त्या स्पर्शासरशी कितीतरी वास त्यांच्या मनात जागे झाले होते. ते कोसळणं किंवा आधार देणं याच्यापलीकडे त्यांच्या अनाथपणाच्या साधम्र्यानं त्यांच्या व्यथित आयुष्याचा वास… अंधा-या माजघरातल्या पेटीतल्या कपड्यांचा वास… कोवळ्या जिवाची कातडी कधीही न भोगलेल्या बाईसांनी माजघरातून मन ओढून काढलं. सवयीनं आणि निष्पाप नवजात बालकाकडे कुतूहलानं पाहावं, तसं त्या राधोकडे पाहू लागल्या.