₹130.00
‘‘कुठल्याही वस्तूची दुर्मीळता झाली की तिची किंमत वाढू लागते. हा अर्थशास्त्राचा सिद्धान्तच वासंतिक वायुलहरींच्या लोकप्रियतेच्या मुळाशी आहे. वर्षाकालातल्या उद्दाम वायाच्या बाबतीतही आपली अशीच वंचना होत आली आहे. मदोन्मत्त हत्तीने शुंडादंडाने सुंदर उद्यान उद््ध्वस्त करावे, त्याप्रमाणे धूळ उधळीत आणि वृक्षवेली उन्मळीत थैमान घालणाया झंझावाताचे जगाने कौतुक करावे, ही प्रथमदर्शनी मोठी विचित्र गोष्ट वाटते. पण मनुष्य बाह्यत: कितीही सुधारला तरी त्याचे मन हे लहान मुलाचेच मन राहते. त्याला भव्यतेचा सदैव मोह पडतो. डोळे दिपविणाया गोष्टीप्रमाणे अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या गोष्टींत काव्य आहे, असे त्याला वाटते. म्हणून तर जगात विध्वंसकांची अजून पूजा केली जाते. रक्ताच्या नद्या वाहविणायांची नावे इतिहास अभिमानाने उच्चारतो. पण एखाद्या नंदादीपाप्रमाणे शांतपणाने तेवत राहणाया, जग आहे त्यापेक्षा थोडे का होईना अधिक चांगले व्हावे म्हणून आयुष्यभर मूकपणाने काम करीत राहणाया माणसाची त्याला आठवणसुद्धा राहत नाही.’’ अंतर्मुख करणारे, नवी दृष्टी देणारे लघुनिबंधसंग्रह.