₹495.00
मराठी मुलं इंग्रजी या विषयापासून, का, कोण जाणे, सतत दूर राहतात. त्यांच्या मनांत इंग्रजीविषयी एक अनामिक भीती वसत असते. इांQग्लशमधे संभाषण करतानाही ती बिचकतात. परिणामी स्पर्धात्मक परीक्षांमधे त्यांची सतत पीछेहाट होताना दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे, इंग्रजी व्याकरणाबद्दल असलेली नावड आणि एवूÂण इंग्रजीबद्दल मनात घर करून बसलेला भयगंड. ही नावड नाहीशी व्हावी, म्हणून; आणि या भयगंडावर मात करता यावी, म्हणून विद्याथ्र्यांच्याच दृष्टिकोनातून व्याकरणाच्या अध्ययन-अध्यापनाची एक नवी पद्धती (शूप्द्) विकसित करून, हे पुस्तक सिद्ध करण्यात आलं आहे. यातील प्रत्येक विभाग अत्यंत कष्टपूर्वक संपादित करण्यात आला आहे. शिवाय मराठी भाषेत विस्तारपूर्वक स्पष्टीकरण देऊन, पारिभाषिक शब्दांचा अडथळा दूर करण्यात आला आहे. सोप्या सोप्या उदाहरणांच्या साहाय्यानं इंग्रजी हा विषय सुलभ व रोचक करण्यात आला आहे. माध्यमिक शाळा, ज्यूनिअर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी व विशेषकरून स्पर्धात्मक परीक्षार्थी व इंग्रजीचे अभ्यासक या सर्वांना हा ग्रंथ सतत हाताशी ठेवावासा वाटेल.