₹295.00
लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहेयाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणाऱ्या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान, भारत नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली अखे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायातील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. बिल गेट्स, अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन.