₹130.00
महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रसंगी केवळ भारतातचनव्हे, तर सा-या जगभर त्यांचे पुण्यस्मरण होत आहे. केवळराजकारणी पुढारीच नव्हेत; तर गायक, नर्तक, चित्रकार,
शिल्पकार सारेच जण शब्द, स्वर, रंग, रेखा, अभिनय ह्यांतूनआपली कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. गांधीजींचे आपणावर तरमोठे ॠण आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालू
शकलो नाही, हा त्यांचा दोष नव्हे. गांधीजींच्या चरित्राचे हेलेखन ही त्यांच्या चरणी वाहिलेली माझी लहानशी फुलाचीपाकळी आहे. ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, अशा मराठीवाचकांसाठी मी हे चिमुकले पुस्तक लिहिले आहे.हे पुस्तक वाचल्यावर गांधीजींच्याविषयी अधिकारी लेखकांनीलिहिलेली चरित्रे वाचण्याची आणि त्यांचे तत्त्वज्ञान अधिक
बारकाईने समजून घेण्याची इच्छा झाली, तर माझ्या ह्यालेखनकामाचे चीज झाले, असे मला वाटेल.