₹200.00
१८८४ साली प्रकाशित झालेली ही आहे मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी. समकालीन वास्तवाचे वर्णन करणारी काल्पनिक कथा. तत्कालीन समाजातील सर्वसाधारण स्तरावर वावरणारी पात्रे. साधी, सोपी, निरलंकार तरीही सुंदर भाषा. ठाशीव व्यक्तिवर्णने अन् रेखीव व्यक्तिचित्रणे. सहज घडणारी तरी खटकेबाज संभाषणे. लौकिक आणि व्यावहारिक पातळीवरचेच, पण नाटयपूर्ण प्रसंग. अशा विविध वैशिष्टयांनी नटलेली ही कादंबरी म्हणजे जणू आजच्या कितीतरी लोकप्रिय कलाकृतींच्या मूळ छटा दाखवणारी साहित्यकृती.
रसिक वाचकाला रिझवणारी, व्यासंगी अभ्यासकाची जिज्ञासा पुरी करणारी, एकोणिसाव्या शतकातील गाजलेली कादंबरी.