Bokya Satbande Part 1 to 3 – बोक्या सातबंडे (भाग १ ते ३)

SKU: 15415
Publisher:
Our Price

390.00

Product Highlights

भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून‘हसवाफसवी’तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूमधमाल हसवणारे, ‘चौकटराजा’ मधल्या नंदू आणि ‘श्रीयुत
गंगाधरे टिपरे’तल्या आबांपासून ‘लगे रहो मुन्नाभाई’मधल्यागांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचामिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे
निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही वखोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगीमाणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येकसंकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ.बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणचयेतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्याहाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात!
‘गुगली’, ‘नवी गुगली’, ‘हसगत’, ‘कागदी बाण’ व ‘झूम’नंतरचं प्रभावळकरांचं ‘बोक्या सातबंडे’ हे एक झकास पुस्तक!प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.

Quantity:
in stock