₹260.00
सत्यजित राय… साहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना, प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट-दिग्दर्शक. रवींद्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूतिभूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे. अशा गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मार्मिक रसास्वाद