₹800.00
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:।मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली,तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो(आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो).§ फाळणीचे मूलकारण कोणते होते?§ जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी?§ फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची
राहणार होती?§ राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता?त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता?§ अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५संस्थानांचे विलीनीकरणझाले असते काय?§ हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते?§ ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेलाअसता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते?§ आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जरभारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावेलागले असते…मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती… जेव्हाफाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शापकाढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचामार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचेनाव का घ्यावे लागले?अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या वफाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणीकरणारा,फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा,राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.