Gavgada : Shatabdee Avruttee – गावगाडा : शताब्दी आवृत्ती

SKU: 15025
Publisher:
Our Price

500.00

Product Highlights

त्रिंबक नारायण आत्रे यांनी 1915 साली लिहिलेल्या‘गावगाडा’ या बहुचर्चित ग्रंथाची ही ‘शताब्दी आवृत्ती’. त्यांनीस्वत: या ग्रंथाचे वर्णन ‘Notes on Rural Sociology and
Village Problems with special reference to Agriculture’असे केलेले आहे. या आपल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्तस्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या आर्थिक व्यवहारातील शेतक-याचेकेंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीनगावगाडयाची कोसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार,सप्रमाण चिकित्सा केलेली आहे.या विशेष आवृत्तीमध्ये लेखक आत्रे यांच्या ‘गावगाडा’ ग्रंथाच्यापहिल्या आवृत्तीची मूळ संहिता, त्यावरील महत्त्वाची अशीसमकालीन समीक्षा, धनंजयराव गाडगीळ, स. ह. देशपांडेव सुमा चिटणीस या अभ्यासकांनी स्वातंत्र्योत्तर काळात केलेलीसामाजिक-आर्थिक चिकित्सा आणि ग्रंथशताब्दीच्या निमित्तानेमुद्दाम लिहवून घेतलेले मिलिंद बोकील व नीरज हातेकर –
राजन पडवळ यांचे लेख, तसाच सदानंद मोरे यांचाही लेखसमाविष्ट आहे. संपादक द. दि. पुंडे यांची सुदीर्घ विवेचकप्रस्तावना आणि परिशिष्ट यांतूनही आत्रे यांच्या ग्रंथाचे अंतरंग
उलगडून घेण्यास साहाय्य होणार आहे.आत्रेरचित ‘गावगाडा’ची ही शताब्दी आवृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र,समाजशास्त्र, कृषिविज्ञान इत्यादी क्षेत्रांतील अभ्यासकांना तर
उपयुक्त आहेच; पण त्याशिवाय गावप्रशासनात गुंतलेल्या सर्वप्रशासकीय अधिका-यांना तसेच जिल्हा परिषदा, पंचायतसमित्या व ग्रामपंचायती यांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनाही
विशेष मार्गदर्शक ठरणारी आहे.

Quantity:
in stock