₹30.00
‘परमेश्र्वराचा कॉम्प्यूटर’ हे या पुस्तकाचे शीर्षकवाचल्यानंतर या लिखाणाचा विषय ‘माणूस’ हाचअसावा हा आपला तर्क बरोबर आहे.पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीत आपण वेगळे आहोत
असे मनुष्याला वाटते, ते त्याच्या सर्वस्पर्शीजाणिवेमुळे. या जाणिवेमुळे माणसाला ‘शब्द’सुचला आणि त्याची भावसृष्टी प्रचंड विस्तारली.असे वेगळेपण असले तरी प्रत्येक प्राणिमात्राचीशरीराची आसक्ती हा स्थायीभाव पण त्याच्यासोबतीला आहेच.शरीर आणि जाणिव यामुळे सदैव अस्वस्थअसलेल्या माणसाच्या मनात अनेक प्रश्न निर्माणहोतात आणि द्वंद्वे उभी राहतात. मनुष्य यातूनघडला-आजही असाच घडत आहे.प्रत्येकाच्या मनात उभ्या राहणा-या अशा प्रश्नांचाआणि माणसाच्या घडण्याचा मागोवा ‘परमेश्र्वराचा
कॉम्प्यूटर’ या लिखाणात घेतला आहे. लेखकालावाटते की स्वत:च्या मनात डोकावण्याचाच हा एकअनुभव आहे. संवाद स्वरूपात मांडलेले हे लिखाणनाटक होते का – का चिंतननाट्य?काही का असेना-आपण वाचा आणि स्वत:च्यामनात डोकावण्याचा प्रत्यय आणि आनंद मिळतोका- तसेच लिखाणाचा शेवट हा माणसाच्याजाणिवेच्या मर्यादाच व्यक्त करितो का- हे सर्वआपणच ठरवा.