₹160.00
‘कंपनी सरकार’ म्हणजे इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचा, राजकीय सत्ता काबीज करण्याचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला हादरे देण्याच्या कारवायांचा इतिहास इंग्रजांनी कंपनीच्या रूपाने, महाराष्ट्राच्या पश्चिम किना-यावर आपले प्रथम पाय टेकले, पण शिवशाहीत त्यांना किना-यावरच रोखले गेले. नंतरच्या काळात, प्रथम आपले त्यांनी स्थान उत्तर भारतात बळकट करून महाराष्ट्रात हातपाय पसरण्यास प्रारंभ केला. मराठ्यांचे शत्रू हेरून त्यांना आपले मित्र बनविले. पानिपताच्या दारूण पराभवानंतर, मराठी मुलखात सुरू झालेले गृहकलह, सरदारांच्या प्रभावामुळे दुभंगत चाललेली मराठी सत्ता, विकलांग झालेली दिल्लीचा पातशाही, या सर्व राजकीय अस्थिरतेचा फायदा उठवून, कंपनीने हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे, हातात घेतली. १८१८ ते १८५७ या सुमारे चाळीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रात कंपनीचा अंमल होता. १८५७ च्या उठावानंतर सारा देशच इंग्रजांनी बळकावला आणि या उपखंडात वसाहतीचे राज्य निर्माण झाले. ‘अशी होती शिवशाही’ आणि ‘पुण्याचे पेशवे’ या ‘महाराष्ट्राचा पूर्वरंग’ या मालेतील ‘कंपनी सरकार’ म्हणजे महाराष्ट्राला
मिळालेला ‘शाप की वरदान’ याचा अल्पसा विचार करून हा शेवटचा भाग सादर करून या मालेला पूर्णविराम दिला आहे.