Kone Eke Kale Sindhu Sanskruti – कोणे एके काळी : सिंधु संस्कृती

SKU: 14871
Publisher:
Our Price

120.00

Product Highlights

सिंधु संस्कृती’ म्हटले की आपले मन प्राचीन काळाकडे खेचले जाते. शेकडो वर्षे आपल्या विस्मरणात गेलेल्या त्या संस्कृतीचे अवशेष १९२१-२२ साली अचानक प्रकाशझोतात आले आणि भारतीय इतिहासाबद्दलच्या देशीविदेशी विद्वानांच्या कल्पना पूर्णपणे बदलल्या. आपल्या भारतीय भूमीत सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी नांदत असलेल्या त्या अत्यंत वैभवशाली संस्कृतीचा म्हणावा तसा परिचय मात्र अजूनही सर्वसामान्यांपर्यंत पोचलेला नाही. ती मोठी सांस्कृतिक उणीव भरून काढणारे हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. सिंधु संस्कृतीतील वैशिष्टयपूर्ण नगररचना, समाज आणि शासनयंत्रणा यांचे परस्परसंबंध, तत्कालीन समाजाच्या विविध धार्मिक व आर्थिक समजुती, त्या लोकांची सौंदर्यदृष्टी व कलासाधना… या आणि इतरही अनेक अंगांनी त्या पुरातन संस्कृतीचा वेध घेणारे हे पुस्तक एका व्यासंगी प्राच्यविद्यापंडिताने लिहिले आहे. सामान्यांना सहज समजेल अशा शैलीत लिहिलेले हे पुस्तक वाचकांचे कुतूहल शमवील, जिज्ञासा जागी करील आणि प्राचीन इतिहासाकडे डोळस नजरेने पाहण्याची प्रेरणा देईल.

Quantity:
in stock
Category: