₹600.00
मराठी लोकांना ‘आपल्या’ इतिहासाचा खूप अभिमान वाटतो. ‘महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे’, असे अभिनिवेशाने म्हणण्यापर्यंत कधीकधी आपली मजल जाते. तथापि आपले इतिहासाबद्दलचे ज्ञान मात्र मध्ययुगापर्यंत – शिवपूर्वकालापर्यंत – जाऊन थबकते. त्यापूर्वीचा समृध्द इतिहास, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत विस्तारता येणारी त्याची मर्यादा, त्या प्रदीर्घ कालखंडातील विविध स्थित्यंतरे आणि चढउतार याबाबत मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. हा ग्रंथ ती तशी माहिती करून देणारा वैशिष्टयपूर्ण ग्रंथ आहे. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव इ. राज्यकर्त्या घराण्यांच्या इतिहासाची दखल घेत पुढे जाणारा हा ग्रंथ शिवशाहीला आणि पेशवाईलाही आपल्या कवेत घेतो
आणि इतिहासाचा तो धागा संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी आंदोलनापर्यंत – अगदी आजच्या महाराष्ट्रापर्यंत – आणून सोडतो. जवळजवळ दोन हजार वर्षांच्या इतिहासातील
अनेक स्थित्यंतरांचा साकल्याने वेध घेणारा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या वर्तमानाकडे व भविष्याकडेही वेगळया नजरेने पाहण्याची दृष्टी आपल्याला देतो… इतिहासाची गती चक्राकार असते,
असे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे मत होते. उत्पत्ती, स्थिती आणि विनाश या अवस्थांच्या फेऱ्यांतून वरखाली होणारे इतिहासचक्र नीट न्याहाळले, तर आपल्याला अनेक बोचऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. सर्व महाराष्ट्रप्रेमींनी आवर्जून वाचावा व संग्रही बाळगावा, असा साधार, साक्षेपी इतिहासग्रंथ…