₹175.00
श्रीशिवराय IAS? आँ? पुस्तकाच्या नावात काही घोटाळा झालाय का? अजिबात नाही! शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुत्सद्दी राजकारणी होते, धुरंधर सेनानी होते,
चारी दिशांना टपलेल्या शत्रूंना जरबेत ठेवणारे अन् रयतेचे अपत्यवत् पालन करणारे राज्यकर्ते होते. या साऱ्याबरोबरच हा जाणता राजा अत्यंत कुशल प्रशासक होता.
महाराजांच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत लढाया आणि प्रशासकीय कामकाज यांच्या काळाचे प्रमाण १:४ असे आहे. आजही आदर्श प्रशासनाचा वस्तुपाठ ठरावा, अशा त्यांच्या कुशल सुशासनाचा परिचय म्हणजेच श्रीशिवराय IAS?