Krishnavivar – कृष्णविवर

SKU: 14753
Publisher:
Our Price

150.00

Product Highlights

कृष्णविवर हा शब्द काव्यात्म वाटला तरी ती संकल्पनावैज्ञानिक आहे. ती खगोलशास्त्रीय संकल्पना बरीच गुंतागुंतीचीआणि किचकट असल्यामुळे समजून घ्यायला अवघड आहे.
त्या संकल्पनेशी संबंधित गणिती सूत्रे म्हणजे सर्वसामान्यांच्यादृष्टीने तर दुर्लघ्य पर्वतच. पण असे क्लिष्ट विषय सोप्याभाषेत समजावून देण्याची हातोटी ज्या मोजक्या मान्यवर मराठीलेखकांना साधली आहे, त्यांच्यात प्रा. मोहन आपटे यांचाआवर्जून समावेश करावा लागेल. त्यांनी लिहिलेले हे पुस्तकम्हणजे कृष्णविवराबद्दलची श्वेतपत्रिकाच आहे, असे म्हटले तरते मुळीच वावगे ठरणार नाही.कृष्णविवर म्हणजे काय, या प्रश्नापासून कृष्णविवराच्यानिर्मिती-स्थिती-लय या त्रिविध अवस्था असतात का, या प्रश्नांपर्यंत
अनेक प्रश्नोपप्रश्नांची सविस्तर, साधार उत्तरे या पुस्तकातदिली आहेत. सृष्टीच्या निर्मितीचे गूढगुंजनात्मक कोडे सोडवण्याच्याप्रयत्नात असणा-या असंख्य खगोलशास्त्रज्ञांच्या संशोधनाचेनिष्कर्ष-दुवे एकमेकांशी जोडून कृष्णविवराचा रहस्यभेद करणारीही सुसंगत कथा प्रा. आपटे यांनी जिज्ञासू वाचकांना सांगितलीआहे.गणिती सूत्रे ज्यांना क्लिष्ट वाटतात त्या वाचकांना गणितावरआधारित खगोलशास्त्रीय संकल्पना निव्वळ विवेचनातून समजावूनदेण्याचे अवघड काम यशस्वीपणे त्यांनी पार पाडले आहेच,पण तशा सूत्रांची भीती नबाळगणा-या जिज्ञासूंसाठी कृष्णविवरच्यासंकल्पनेशी निगडित असणारी काही सोपी गणिती सूत्रेहीत्यांनी मुद्दाम पुस्तकाच्या शेवटी दिली आहेत.जिज्ञासूंबरोबर जाणकारांनीही आवर्जून वाचावे आणि दादद्यावी, असे हे पुस्तक.

Quantity:
in stock